युनिकोड टाइप करण्यासाठी आपण सर्वच जण बरहा वगैरे प्रोगॅम्स वापरता का?
Penyiaran jaluran : truptee
truptee
truptee  Identity Verified
Local time: 14:04
Bahasa Perancis hingga Bahasa Inggeris
+ ...
Feb 5, 2010

मी कोणताच इतर प्रोग्रॅम वापरत नाही.
कारण युनिकोड मी विंन्डोज़वरच सुरू करून घेतलंय..

मला *अ‍ॅ* कसं टाइप करायचं हे मात्र अद्याप समजलेलं नाहीये.

युनिकोडवर हे अक्षर किंवा हा अक्षरसंयोग त्यांनी दिला असल्यास कोणी मला त्याबाबत सांगू शकेल का?

धन्यवाद.


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Amerika Syarikat
Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris
+ ...
मी गमभन किंवा बरहा वापरते Feb 5, 2010

बरहा मध्ये 'application' 'apple' मधला अ‍ॅ टाईप करता येत नाही. तशी सुविधा उपलब्ध नसल्याचं मला स्वत: बरहाच्या निर्मात्याने कळविले आहे.
त्यापेक्षा मी गमभन (http://www.gamabhana.com/?q=node/2) हल्ली जास्त वापरते. त्यात ही अडचण येत नाही आणि टाईपिंग करणे (बरहापेक्षा) जास्त सुलभ आहे.


 
truptee
truptee  Identity Verified
Local time: 14:04
Bahasa Perancis hingga Bahasa Inggeris
+ ...
TOPIC STARTER
मला कोणी थेट युनिकोड वापरून.. Feb 6, 2010

"थेट" युनिकोड वापरून (इतर कोणत्याही दुय्यम अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीशिवाय) अ‍ॅ टाईप करण्याचा मार्ग मला कोणी सुचवू शकले तर मी अत्यंत ऋणी राहीन.

मी माझ्या विन्डोज़मध्ये युनिकोड सक्रिय करून घेतले असल्याने मला इतर कोणत्याही दुय्यम अ‍ॅप्लिकेशनची मदत लागत नाही.

ही सुविधा मायक्रोसॉफ्टने प्रत्येक विन्डोज़ प्रोफेशनल आवृत्तीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.

परंतु, मूळ समस्या (अ‍ॅ टाईप करण्याची) मात्र तशीच राहते आहे.

कोणाकडे काही मार्ग आहे का???


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Amerika Syarikat
Bahasa Jepun hingga Bahasa Inggeris
+ ...
तुझी समस्या दूर झाली का? Mar 16, 2010

तृप्ती, तुझी वर दिलेली समस्या दूर झाली का?
झाली असल्यास कशी झाली ते सांगशील का म्हणजे आम्हा सर्वांनाही माहिती मिळेल.

धन्यवाद


 
rajeshkhilari
rajeshkhilari
India
Local time: 14:04
Bahasa Marathi hingga Bahasa Inggeris
Windows मध्ये मराठी टाईप करण्याची सोय आहे. Apr 25, 2011

हा फाँट mangal असून तो परिपुर्ण आहे. यात काहीही, कसेही टाईप करता येते. हे बरहा पेक्षा अधीक प्रगत आहे. त्याच बरोबर sanskrit 2003 हा सुद्धा युनिकोड फाँट असून mangal सारखेच काम करतो पण दिसायला mangal पेक्षा सुंदर आहे.... See more
हा फाँट mangal असून तो परिपुर्ण आहे. यात काहीही, कसेही टाईप करता येते. हे बरहा पेक्षा अधीक प्रगत आहे. त्याच बरोबर sanskrit 2003 हा सुद्धा युनिकोड फाँट असून mangal सारखेच काम करतो पण दिसायला mangal पेक्षा सुंदर आहे.

'ऍ' 'ऑ' आणि 'ँ' टाईप करणे फार सोपे आहे Google वर Mangal font mapping शोधले तरी या फाँटचा तख्ता मिळतो.

क + Capital A = कॅ
क + small e = के
क + Capital O = को
क् + small o = क़ॉ
क् + Capital M = कँ
क + small a + small a + Capital M = काँ
Capital G + small y + small a = ज्ञ

आता वर मी दिलेले सर्व copy करून Word document मध्ये paste करा. त्याचा font size वाढवा आणि मला काय म्हणाचे आहे ते लक्षात येईल.
Collapse


 


Tiada moderator ditugaskan khusus untuk forum ini.
To report site rules violations or get help, please contact site staff »


युनिकोड टाइप करण्यासाठी आपण सर्वच जण बरहा वगैरे प्रोगॅम्स वापरता का?






LinguaCore
AI Translation at Your Fingertips

The underlying LLM technology of LinguaCore offers AI translations of unprecedented quality. Quick and simple. Add a human linguistic review at the end for expert-level quality at a fraction of the cost and time.

More info »
CafeTran Espresso
You've never met a CAT tool this clever!

Translate faster & easier, using a sophisticated CAT tool built by a translator / developer. Accept jobs from clients who use Trados, MemoQ, Wordfast & major CAT tools. Download and start using CafeTran Espresso -- for free

Buy now! »